श्री गुरुदेव सेवा मंडळ ता.लाखांदूर तर्फे दिनांक 30 एप्रिल 2018 ला मानवतेचे महान पूजरी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्राम जयंती उत्सव व जगाला शांतीचा संदेश देणारे विश्व शांती दूत महाकरूनिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त द्वारकाधिश मांदिर लाखांदूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात  आले.
      यावेळी मा. प्रभाकरजी बुराडे    यांच्या अध्यक्षतेखाली रमेशजी भैय्या,मडावी महाराज,  गोविंदराव भूरले, रामचंद्र भावे,हिरामण कोड्डे,गंगाधर राऊत,श्रीधर राऊत,कवीतताई राऊत,अर्चनाताई भोंगाडे, आसारामजी ठाकरे,दामोधरजी पारधी,रामेशजी पारधी,रामचंद्र राऊत,ज्ञानेश्वर बुराडे,मधुकर शहरे,सुरेश लंजे,नीलकंठ करांडे, डॉ. मडावी,योगेश कुटे यांचे उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
 प्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून संकल्प गीताने सुरुवात झाली.
 या निमित्ताने मागील वर्षीच्या शिबिरातील विद्ध्यार्थ्यांनि आपले सुसंस्कार शिबिरा बाबद मनोगत व्यक्त केले.यामध्ये अभिजित रासेकर, काव्य डीब्बे, भूषण प्रधान,जयेश डीब्बे,युगल प्रधान,संकेत प्रधान,समीर प्रधान
       अध्यक्ष प्रभाकर बुराडे यांनी भगवान गौतम बुद्ध व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून शिबिरामध्ये विषमुक्त शेती हा विषय घेण्याची सूचना केली. मधुकर शहरे यांनी गौतम बुद्धाची तत्वप्रणाली व गुरुदेवाची तत्वप्रणाली एकाच असल्याचे सांगितले,ज्ञानेश्वर बुराडे, कवीतताई  राऊत,मडावी महाराज, यांचे मार्गदर्शन मिळाले.
याच मंडळातर्फे दिनांक 11 मे ते 22 मे पर्यंत सुसंस्कार शिबिराचे
आयोजन केले आहे.
       याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंडळाचे सचिव योगेश कुटे,महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चनाताई भोंगाडे,गणेश कुंभारे,तोषित नाकतोडे,शिवानंद नालबंद,रमेश प्रधान,मेहबूब पठाण,विशाल प्रियनी,गिरीधर तोंडरे,शंकर प्रधान,गुरुदेव राऊत,अनिकेत राऊत,रमेश भजने,गुंजेपार चे सरपंच उत्तम भागडकर यांनी रक्तदान केले.
         योगेश  कुटे  यांनी संचालन तर सुरेश लंजे यांनी आभार मानले.
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   गोपाल शहरे,गजानन ठाकरे,नंदा कुटे,निशा राऊत,निर्मल पिलारे,लीनता पिलारे सुनीता ठाकरे यांनी सहकार्य केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours