17 ऑगस्ट : अटलजींच्या जाण्याने जे दु:ख झालं ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी केलेली देशाची सेवा कायम स्मरणात राहिल. अशी भावना अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या. या ट्विट सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अटलजींसोबतचा एक फोटोही ट्विट केलाय. त्यावेळी देवेंद्र हे शाळेत होते. अटलजी हे नागपूरात आले असताना देवेंद्र त्यांना भेटले त्यावेळी अटलजींनी त्यांना जवळ घेत त्यांचं कौतुक केलं होतं.

वडिलांच्या जाण्याएवढच दु:ख- लता दीदी
ज्या वेळी माझे वडिल गेले त्या वेळी जे दु:ख झालं तेवढच दु:ख अटलींच्या जाण्याने झालं अशी प्रतिक्रीया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. अटलजी मला मुलगी मानायचे. त्यांच्या कवितांची कॅसेट जेव्हा मी काढली तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केली.
अटलजी हे माणूस म्हणूनही खूप मोठे होते. वाजपेयी जेव्हा पाकिस्तानला बस घेऊन गेले त्यावेळी वाजपेयींनी मला फोन करून पाकिस्तानला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. तुम्ही आलात तर पाकिस्तानातल्या लोकांनाही आनंद होईल असं ते म्हणाले पण काही कामांमुळे मला जाता आलं नाही.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours