मुंबई: पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी  शिवसेनेनं आज एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षाबद्दल ठोस भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या 3 नेत्यांना निलंबित केलं आहे. या 3 नेत्यांनी काही प्रकरणात गैरप्रकार केले असल्याने त्यांना निलंबित केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यात एका नेता पार्टीच्या नावावर पैसे खात होता, तर दुसरा परस्पर वादांवरून वरिष्ठ नेत्याची गुप्त माहिती जमा करत होता असे आरोप या 3 नेत्यांवर ठेवण्यात आले आहेत. जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी अशी या तीन नेत्यांची नावं आहेत. यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातून निलंबित केलं आहे.
दरम्यान, गैप्रकार करणाऱ्या कोणत्याही शिवसैनिकाला शिवसेना सहन करणार नाही अशी ठोस भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे पक्षाला बदनाम करणाऱ्यांवर चपराक बसेल असा यामागचा हेतू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours