औरंगाबाद: नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अंधुरेला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री सचिन अणदूरे या आरोपील अटक करण्यात आला आहे. सचिन अणदूरेला आई वडील नसून एक लहान भाऊ आहे. तो विवाहित असून त्याला 1 लहान मुलगी आहे. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे.
डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता कुठे त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात सीबीआयला यश आलं आहे. दरम्यान, सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का आणि कोणाच्या या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं आता याचाही लवकरच उलघडा होईल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धाविरोधात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचं केंद्र होतं पुणे. पुण्यातून निघणार्या साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली. दुदैर्व म्हणजे याच पुण्यात त्यांचा खून झाला.
डॉ.नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघंही हल्लेखोर बाईकवर बसून परागंदा झाले.
Post A Comment:
0 comments so far,add yours