सातारा : तब्बल पाच वर्षांनंतर डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी सीबीआयने मारेकरी सचिन अंदुरेला जेरबंद केलंय. दाभोलकरांच्या मारकऱ्याला अटक व्हावी या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून दाभोलकरांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते लढा देत होते. सीबीआयच्या या कारवाईबद्दल हमीद दाभोलकर यांनी समाधान व्यक्त केलंय.

डाॅ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पहिली अटक करण्यात आली. याआधी विरेंद्र तावडेला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्यानंतर ही दुसरी अटक आहे. सीबीआयची कारवाई स्वागतहार्य आहे. आता सीबीआयने या प्रकरणाची पाळमुळं शोधून काढली पाहिजे अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी कोर्टाने गेल्या अडीच वर्षात  तपासावर देखरेख ठेवली. आणि अंधश्रद्धा निर्मुल समितीने या प्रकरणी पाठपुरावा केला. त्यामुळे या तपासात ही प्रगती दिसतेय. लवकरात लवकर गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश मारेकरी सापडले जातील अशी अपेक्षाही हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान,डॉ.नरेंद्र दाभोलकरांची गोळी झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय. गोळी झाडणाऱ्याला औरंगाबादमधून अटक झालीये. त्यामुळे एटीएस आणि सीबीआयच्या हाताला तब्बल 5 वर्षांनी मोठं यश आलंय. सचिन अंदुरे असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्यानं हत्येची कबुली दिल्याची माहिती सीबीआयनं दिलीये. नऊ महिन्यांपासून तो औरंगाबादेत राहण्यासाठी आला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours