ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने ठाण्यातील एकाही गणपती मंडपाला हात लावला तर त्यांचे हात छाटू अशी धमकी वजा इशारा ठाणे जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. शिवसेना फक्त मराठीचा गाजावाजा करतेये पण या मराठी सणांना संपवण्याचे काम ही शिवसेना करतेये. गेली अनेक वर्षे ठाण्यात सेनेची सत्ता असताना देखील सार्वजनिक मंडळांना वाऱ्यांवर सोडलं जातंय. पण त्यांच्या पाठीमागे मनसे खंबीर पणे उभी असल्याचे देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मुर्ती बनवण्याकरता फुटपाथ तसंच इतर ठिकाणी रस्त्यावर खड्डे करून मंडप उभारले गेलेत. ते ठाणे मनपाने काही ठिकाणी काढले तर काही ठिकाणी काढण्याचे आदेश दिलेत. दुसरीकडे गेल्या वेळेस रस्त्यांवर खड्डेकरून मंडप उभारण्यास एका खड्ड्याला ५०० रुपये दंड होता तो आता २००० हजार रुपये दंड केला आहे. 500 रुपयावरुन ही रक्कम 2000 रूपये करण्यात आल्याने गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours