मुंबई, 25 सप्टेंबर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनेने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आजच प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. मात्र आपल्या मागण्यांबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका प्राध्यापक संघटनांनी घेतलीय.

राज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, प्राध्यपकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अभ्यास मंडळातील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ निस्तरावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकीत 71 दिवसांचे वेतन मिळावे या सगळ्या मांगण्यासाठी आजचा संप छेडण्यात आला आहे. यांसह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांच्या 'महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन' या संघटनेनं हे आंदोलन पुकारलं आहे.

शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती पुटाचे (पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशन) अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी दिली. दरम्यान, या संपाचा मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम या संपामुळे रखडणार आहे. त्यामुळे यावर आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यावर तकाय तोडगा काढतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours