जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा: महात्मा फुले समता परिषद जिल्हा भंडारा तर्फे 
 दि.२८-९-२०१८ राेजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले यात इंधन दरवाढ कमी करण्याचे, शेतकऱ्यांना हमीभाव देन्यात यावे ,वृद्धांचे पेंशन वाढ व ईतर मागण्यांचे समावेश आहे.
-----एन डी ए प्रणित केन्द्र शासनाच्या चुकीच्या धाेरणांचा व त्यांच्या अमलबजावणी मधे झालेल्या तृट्यांमधे संपुर्ण अर्थव्यवस्था काेलमडलेली आहे.सामाजिक,आर्थिक आणि काैटुबिक समाजावर याचे परिणाम झालेले आहेत.पेट्राेल,डिजल  च्या वाढत्या दरामुळे जिवनावश्यक वस्तुंवर सुद्धा याचे परिणाम झालेले असुन महागाई सुद्धा वाढतंच आहे.या मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजट बिघडत अाहे.या करिता जनसामान्यांना परवडेल या स्तरावर पेट्राेल,डिजल, व गँस चे दर कमी करण्यात यावा,शेतकऱ्यांना धान पिकासाठी ३००० रु.प्रति क्वि.हमीभाव देण्यात यावा,शेतकरी शेतमजुर व कामगारांना ५००० रु.प्रति महिना पेंशन देण्यात यावी,निराधार याेजना व ईतर शासनाद्वारे वृद्धांच्या याेजनांमधे पेंशन ३००० रु.देण्यात यावी,केसरी शिधापत्रिका धारकांना ३५ किलाे अन्नधान्य घरपाेच देऊन प्रत़्येक शिधापत्रिकांना ३ लिटर केराेसिन चे वाटप करन्यात यावे या सर्व मांगण्यांचे निवेदन महात्मा फुले समता परिषद जिल्हा भंडारा तर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत  शासनाला देण्यात आले.निवेदन देताना  समता परिषद चे जिल्हा अध्यक्ष संताेष भेदे,सुर्यकांत भाऊ ईल्मे,विशाल तिरपुडे, लखनलाल चाैटे,अरुन भेदे,विलास ईश्वरकर,गिरीष भेदे,सुनिल मेश्राम,सुनिल बनकर,अनिल किरणापुरे,प्रशांत मेश्राम,लीलाधर बारस्कर,रुपलता जांभुळकर,शुभांगी श्रुंगारपवार,मनिषा नागलवाडे,आशा गिऱ्हेपुंजे प्रामुख्याने उपस्थित हाेते।







Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours