नागपूर : महापालिकेच्या वतीने शहरातील अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयातील देवीदेवतांचे फोटो आणि मूर्ती काढून त्या बाहेर आणल्या आणि निदर्शने केली.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महानगर पालिकेतील महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि इतर सर्व समिती पदाधिकाऱ्यांच्या दालनांतील देवीदेवतांचे फोटो आणि मूर्ती काढल्या आणि त्या महापालिके बाहेर आणून आंदोलकांनी निदर्शने केली.
नागपूर शहरात रस्त्यांवर आणि सार्वजिनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या सर्व धर्माच्या जवळपास १५०० धार्मिक स्थळांवर महापालिकेच्यावतीने कारवाई सुरु आहे. आमची धार्मिक स्थळे सुरक्षित नाहीत, तर आमचे देवी-देवता या कार्यालयात कसे सुरक्षित राहु शकतात? असा प्रश्न उपस्थित करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. गणोशोत्सवादरम्यान महापालिका दरवर्षी कार्यालयाच्या परिसरात गणपती बसवते. शहरभरातील मंदिरे पाडली जात असताना, गणपती बसविण्याचा अधिकार मनपाला कुणी दिला? असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours