अमरावती: खासगी विवाह मंडळांकडून लावले जाणारे विवाह नियमबाह्य असल्याचा निर्णय अमरावती कौटुंबिक न्यायालयानं दिलाय. 2012 साली अमरावती इथल्या चंद्रकला विवाह मंडळात मुस्लिम युवकानं बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदू मुलीशी लग्न झाल्याचं दाखवलं होतं. मात्र युवतीनं आपला विवाह झाला नसल्याची तक्रार केली. यानंतर विवाहाची नोंदळी करण्याचा अधिकार केवळ दुय्यम निबंधक किंवा पालिका हद्दीतील सहाय्यक आयुक्तांना असल्याचा निर्णय दिला.
विवाह लावून देण्याचा किंवा नोंदणी करण्याचा अधिकार केवळ दुय्यम निंबधक किंवा मनपा हद्दीत सहायक आयुक्ताना असताना अनेक खाजगी विवाह मंडळे युवक युवतींनी विवाह लावून देतात हे सर्व विवाह नियमबाह्य असल्याचा निर्णय अमरावती कौटुंबिक न्यायलयाच्या न्यायाधीश इंद्रकला नंदा यांनी दिला आहे.
एका मुस्लिम युवकाने हिंदू मुलीचे सर्व बनावट कागदपत्राच्या आधारे 2012 साली अमरावती येथील चंद्रकला विवाह मंडळात विवाह झाल्याचे दाखवले. मात्र सदर युवतीने आपण विवाह केली नसल्याची तक्रार केली. या प्रकरणी सदर युवकास 3 वेळा उच्च न्यायालयातून फटकरण्यात आले. या प्रकरणी सर्व चौकशी अंती अश्या खाजगी विवाह मंडळास लग्न लावून देण्याचा तसंच कोणताच अधिकार नसल्याचं सिद्ध झाले. यामुळे सदर युवतीला न्याय मिळाला.
अमरावती जिल्ह्यात तब्बल 10 ते 15 विवाह मंडळे आहेत त्यांच्या माध्यमातून 50 हजाराच्या वर लावण्यात आलेले विवाह अवैध ठरणार आहेत. सदर पीडित मुस्लिम युवतीच्या वतीने अॅड भावना ठाकरे यांनी बाजू मांडली.
चंद्रकला विवाह मंडळाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसंच अॅड महेश देशमुख यांची महाराष्ट्र गोवा बार कौसिलकडे तक्रार करण्याचे आदेश न्या इंद्रकला नंदा यांनी दिले.
Post A Comment:
0 comments so far,add yours