मुंबई, 1 ऑक्टोबर : मुंबई हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. यावेळी भाजपने क्लीन स्वीप करत पूर्ण 25 जागांवर विजय मिळवला. यात शिवसेनेला पराभवाचा फटका सहन करावा लागलाय.
सेनेनं आपल्या जाहिरनाम्यात शाकाहारी लोकं राहात असलेल्या सोसायट्यांमध्ये मांसाहारी लोकांना फ्लॅट उपलब्ध करून देण्यासंदर्भात उल्लेख केला असल्यामुळेच शिवसेनेला किंमत चुकवावी लागल्याचं बोललं जातंय. तर लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांपूर्वीच शिवसेनेला हा मोठा फटका बसला असल्याचं मानलं जातंय. मुंबईत जवळपास 22000 गृहनिर्माण सोसायट्या आहेत, त्यापैकी जवळपास 3500 सोसायट्यांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली होती.
हाऊसिंग सोसायटीची निवडणूक रविवारी मंबईत पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाऊसिंग सोसायटीची निवडणूक ही सेमीफायनल मानली जात होती. आणि त्यासाठी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वतःला अक्षरशः स्वतःला झोकून दिले होते.
भाजपने या निवडणुकीची जबाबदारी विधानसभा सदस्य प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर याच्याकडे, तर शिवसेनेने ही जबाबदारी अरविंद सावंत आणि विनोद घोसालकर यांना सोपवली होती. सेनेनं निवडणुकीसाठीच्या आपल्या जाहिरनाम्यात मांसाहरी लोकांना शाकाहारी लोकं ज्या सोसायट्यांमध्ये राहातत त्या ठिकाणी फ्लॅट उपलब्ध करून देणार असल्याचा दावाही केला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात गुजराती आणि जैन समाजाचे लोकांना नाराज केल्याचं विशेषतज्ञांचं मत आहे. याचा परिणाम असा झाला की, सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागांवर भाजपने मताधिक्य मिळवलं.
निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सेनेचे विनोद घोसालकर आणि अन्य नेत्यांनी पलटवार करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलंय. तर सेनेला चारी मुंड्या चित केल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सेनेने जातीवर राजकारण केलं आणि भाजपनं विकासाच्या मुद्यावर अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रसाद लाड यांनी दिलीय.
Post A Comment:
0 comments so far,add yours