नवी दिल्ली - एमडीएच उद्योगसमुहाचे प्रमुख धर्मपाल गुलाटी यांच्याविषयीच्या अफवेमुळं त्यांच्याविषयी देशभर चर्चा झाली. 99 वर्षांचे गुलाटी हे अफलातून असं व्यक्तिमत्व आहे. शतकी वाटचाल सुरू असतानाही ते आजही जोमानं काम करतात. कंपनीत जातात. त्यांच्याविषयीच्या या खास 10 गोष्टी वाचून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

1. आर्यसमाजाचे अनुयायी - धर्मपाल गुलाटी हे आर्यसमाजाचे कट्टर अनुयायी आहेत. राजधानी नवी दिल्लीत त्यांच्याच पुढाकाराने नुकतच विश्व आर्यसमाज संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात जगभरातल्या अनेक देशांमधून आर्यसमाजचे अनुयायी आले होते.

2. टांगाही चालवला - धर्मपाल यांच्या वडिलांनी सियालकोट (आता पाकिस्तानात) मध्ये 1919मध्ये मसाल्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटूंबीय दिल्लीत स्थायिक झाले. तेव्हा सुरूवातीला त्यांनी उपजिविकेसाठी टांगाही चालवला होता. त्यानंतर करोलबाग इथं एका लाकडाच्या लहानश्या पेटील मसाले विकायला सुरूवात केली. तेव्हापासून तो व्यवसाय वाढतच गेला.

3. ब्रॅण्ड अॅम्बेसिडर - धर्मपाल हे एमडीएच मसाल्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. गेली अनेक वर्ष ते कंपनीच्या मसाल्यांचे ब्रॅण्डींग करतात. आणि त्यांच्या त्या जाहीरातीला उत्तम प्रतिसादही मिळतोय. एमडीएच मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर त्यांचा फोटो असतो.

4. बाजारावर नियंत्रण - एमडीएच ची सुरूवात छोट्या स्तरपासून झाली असली तरी कंपनीचा आजचा व्याप प्रचंड मोठा आहे. देशातल्या मसाला बाजारात कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. कंपनी 62 प्रकारची उत्पादनं तयार करते. ही सर्व उत्पादनं 150 पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours