बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगावच्या सभेत अशोक चव्हाण यांची जिभ घसरली. मालेगावच्या संघर्ष यात्रेवेळी भाषण करताना चव्हाणांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची लघवी करणाऱ्या व्यक्तींबरोबर तुलना केली आहे. केंद्रात आणि राज्यात सारखीच परिस्थिती कोणाकडे कैफियत मांडावी कळत नाही. शाळेत लघवी करणाऱ्या मुलाची आणि गच्चीवर लघवी करणाऱ्या वडिलांची गोष्ट सांगताना त्यांनी ही तुलना केली आहे. कांग्रेस संघर्ष यात्रा मालेगावात दाखल झाली आहे. ही जाहीर सभा सुरू असताना मंचावर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours