मुंबई: राजकारणी म्हटलं की राजकीय विषय ओघानं येतोच. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपल्या आईच्या आठवणीत रमून गेले. या प्रकाशनावेळी शरद पवारांनी बालपणापासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
ग्रंथाली प्रकाशन पत्रकार संदीप काळे यांच्या 'मु. पो. आई' या पुस्तकाच प्रकाशन एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. सुमारे ३० संपादक यांनी आई विषयी लेखन या पुस्तकात केले. खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, अभिनंदन थोरात यावेळी उपस्थित होते.
कुमार केतकर यांना माझ्या आधी बोलायचे होते त्यासाठी ते प्रयत्न करत होते, त्यांना कोणती जागा कधी घ्यायची हे चांगले माहिती पण ते राज्यसभेत माझ्यापेक्षा नवखे आहेत त्यामुळं मला आधी बोलता आले असं सांगत पवारांनी केतकरांची फिरकी घेतली.
पवार पुढे म्हणाले, "आई विषयी पुस्तक हे वेगळे आहे कौतुक वाटते. चांगल्या जाणकार संपादकांचे आई विषयी लिखान या पुस्तकात आहे. मी ही या पुस्तकात लिहीले आहे. माझी आई वेगळी रसायन होते. मुलगी, स्त्री आणि माता अशा वेगळ्या रूपात स्त्री पाहायला मिळते."
माझी आई कोल्हापूर येथील, महसूल विभागात त्यांचे वडील काम करत, माझ्या लहानपणीच तिची आई गेली. संघर्ष तेव्हापासून आईला शिकवले. मोठ कुटुंब आमचे होते.
आईने ध्यास केला घरातील सर्वांना शिक्षण द्यायचे तसं दिले. शिक्षणात माझे सहकारी शरद काळे १ क्रमांक मिळवत, मी मात्र ३५ गूण कसे पडतील याच विचारात असायचो. अजित पवार यांचे वडील माझे भाऊ हे थोडे खट्याळ होते. आता अजित पवार यावरून समजत असेलच असं सांगता सभागृहात एकच हशा पिकली.
सगळ्यांना घडविण्याचे काम आईने केले, मुलांनी शिकले पाहिजे यासाठी ती आग्रही होती, जिद्दी होती. तिने खूप कष्ट सगळ्या भांवडांसाठी केले.
"पुण्यात अचानक काॅलेज काळात आई चक्कर मारत असे नक्की आम्ही काॅलेजमध्ये काय करतो हे पाहायला यायची.
एकदा गावातील वळूने आईला ठोकरले. त्यात पायाचे हाड मोडले, नंतर आई कुबड्या घेऊनच चालायची. आम्ही काही चुकलो की भीती वाटायची कारण तिच्या हातात कुबड्या असायच्या कारण कधी काय होईल सांगता यायचे नाही असा किस्साच पवारांनी सांगितला.
"आईचं बाळतंपण असून तिसऱ्या दिवशी पुण्यात मतदान बैठकीला हजर होती. ते आपत्य दुसरे तिसरे कोणी नाही मीच होतो, कदाचित त्यामुळे आयुष्यात पुढं ५० वर्ष निवडणुका जिंकत राहिलो असा उजाळा पवारांनी दिला.
तुम्ही किती ही मोठी झाला तरी लहान व्हावे हे आईसमोर वाटतं, संकटात ताकद देणारी ती आईच असते अशी भावनाही पवारांनी व्यक्त केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours