नंदुरबार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखानंतर नंदुरबारमधील चौधरी चहावाले चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मात्र पोटाच्या दोन वेळची खळगी भरण्यासाठी आजही हे रामदास चौधरी वयाच्या सत्तराव्या वर्षी घरुन चहा बनवून रोज भल्या पहाटेच्या रेल्वेत प्रवास करुन विकत आहे.
शिर्डीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी नंदूरबारच्या चौधरी चहावाल्याचा उल्लेख केल्याने ते रातोरात लोकप्रिय झालेत. वयाच्या सत्तरीतही आपल्या धारदार मिशांवर ताव देणारे चौधरीचाचा आजही भल्या पहाटे उठतात आणि चहा बनवतात आणि नंदूरबार स्टेशनवर जाऊन प्रवाशांना वाफाळलेला गरमागरम चहा पाजतात.रेल्वे प्रवासादरम्यान मोदींना चहा पाजल्याची आठवणही ते आवर्जून सांगतात.
मोदींनी उल्लेख केल्याने चहावाले चौधरी प्रकाशझोतात आले असले तरी त्यांचं जीवनमान मात्र आजही हलाखीचेच आहे. नंदुरबार मधल्या मध्यवस्तीतील अतिशय रुंद अशा घरात ते राहतात, तिथंच चहा बनवतात आणि भल्या पहाटे सुरतकडे जाणाऱ्या हावडा एक्स्प्रेसमध्ये जाऊन चहाची विक्री करतात.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours