जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा: माेटार वाहनातील हाेणारे मृत्यु टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर प्रभाविपणे राबविण्याचे आदेश मा.सर्वाेच्च न्यायालयाकडुन शासनास प्राप्त झालेले असुन भंडारा जिल्हा पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांनी जनतेला आवाहण केला आहे कि,जिल्ह्यात वाढत्या अपघाताचे प्रमाण व दुचाकी स्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे डाेक्याला ईजा हाेवुन मृत्युचे प्रमाण सुद्धा वाढलेले असुन त्यावर आळा बसविण्याकरिता प्रत्येक दुचाकी स्वारांनी दुचाकी चालवितांना हेल्मेट घालुनंच दुचाकी चालविणे गरजेचे असुन नागरिकांनी घराबाहेर जातांना ISI दर्जाचे हेल्मेट परिधान करुनंच प्रवास करावा जेणेकरुन त्यांचे कुटुंबिय काळजित राहणार नाही.
------या हेल्मेट सक्ति चे  सामान्यजनतेवर कार्यवाही करण्यापुर्वि ज्यांचे कडुन याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे त्या पाेलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडुन आदेशाचे पालन हाेणे आवश्यक आहे म्हणुन भंडारा जिल्हा पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांनी सर्व पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट खरेदी व वापराकरिता एक महिन्याची मुदत देवुन अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता बाजारभावापेक्षा अतिशय स्वस्त दरामधे पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता ISI दर्जाचे हेल्मेट पाेलीस कँन्टिन मधे उपलब्ध करुन देण्यात आले हाेते.या बाबतची मुदत दि.३०-९-२०१८ला संपली असुन पाेलिस अधिक्षक विनीता साहु व अपर पाेलिस अधिक्षक रशमि नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१-१०-२०१८ पासुन माेटार सायकल चालवुन हेल्मेट चा वापर न करणाऱ्यां पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपअधिक्षक (गृह) बन्साेडे व वाहतुक पाेलीस निरीक्षक गाडे व यांच्या सहकर्मचाऱ्यांनी स्वत: एकुण ६ कायदेशिर कार्यवाही करुन ३०००रु.दंड वसुल केला आहे.ही कार्यवाही या पुढेही सतत सुरु राहनार असुन त्यामधे अन्न विभागातील शासकिय अधिकारी व कर्मचारी सुद्धा हेल्मेट न वापरल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असुन काही दिवसांनी जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेवर सुद्धा दुचाकी चालवितांना हेल्मेट सक्ति करण्यात येनार असुन हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.पाेलिस मुख्यालय भंडारा येथिल पाेलिस कँन्टिनमधे नागरिकांकरिता बाजारभावापेक्षा स्वस्त दरात ISI दर्जाचे हेल्मेट उपलब्ध करुन देण्याबाबत विचार सुरु आहे।



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours