पुणे, 21 आॅक्टोबर : समलैंगिक संबंधाला नकार दिला म्हणून एका तरुणावर भरदिवसा चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीये. हल्ला करणाऱ्या तिघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.
दुपारी २.३० वाजेच्या सुमारास टिळक रोडवरील गिरिजा हॉटेलसमोर दिनेश ऊर्फ सुरेश कांबळे हा तरुण उभा होता. त्यावेळी मयुर मोतीराम राठोड, महेश धनेश तिवारी आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा तिथे आला. या तिघांनी दिनेशला समलैंगिक संबंधासाठी विचारणा केली. परंतु, दिनेशने त्याला नकार दिला. त्यामुळे तिन्ही मुलांसोबत दिनेशला वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या तिन्ही मुलांनी दिनेशवर चाकूने सपासप वार केला.
चाकूने हल्ला केल्यानंतर तिन्ही अल्पवयीन मुलांनी पळू जाण्याचा प्रयत्न केला असता तिथे उपस्थितीत असलेल्या काही नागरिकांनी पकडले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही मुलांना ताब्यात घेतलं.
जखमी दिनेशला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours