अहमदनगर, 22 ऑक्टोबर : अहमदनगर -पुणे मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू  झाला. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा इथं पहाटे साडेपाच वाजता हा अपघात घडला. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकला धडक बसल्यानंतर बसमधील अनेकजण जखमी झाले. जबर मार लागल्याने चालकासह इतर सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर काही वेळातच पोलीस तिथं हजर झाले. पण पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याने जखमींना तातडीने मदत मिळू शकली नाही. आता या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, बसची धडक बसल्यानंतर अर्धा ट्र्क वेगळा झाला. तसंच बसचीही अवस्था अत्यंत वाईट झाली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours