डहाणू- मुंबईहून गुजरातकडे  जाणाऱ्या मालगाडीच्या दोन डब्यांना काल रात्री आग लागली. या आगीमुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक काहीवेळेसाठी ठप्प झाली. वाणगाव ते डहाणू स्टेशनदरम्यान ही आग लागली. प्लॅस्टिकचे ग्रॅन्युल्स ट्रॅकवर कोसळल्यामुळं संपूर्ण परिसरात ही आग विसरली. मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या डहाणू पलिकडे थांबवण्यात आल्या आहेत. तसंच विरार ते डहाणू ही उपनगरीय सेवाही बंद ठेवण्यात आली. ही रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास सकाळचे १० वाजण्याची शक्यता आहे.

विरारच्या  पलीकडे जाणाऱ्या व मुंबईकडे येणाऱ्या  गाड्यांची सेवा पूर्णपणे बंद असून ही सुरळीत होण्यात सकाळचे ९ ते ९.३० वाजतील असा प्राथमिक अंदाज आहे. प्लॅस्टिकचे ग्रेनील असलेल्या दोन डब्यांना रात्री  आग लागल्यामुळे वाणगाव ते डहाणू दरम्यान ही माल गाडी थांबवण्यात आली. आग विझवण्यात समाज विभाग मुंबराला यश आले असले तरी डब्यामध्ये असलेले प्लॅस्टिकचे ग्रॅन्युल्स खाली ट्रॅकवर कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात आग पसरली.

वाणगाव ते डहाणू दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प असून मध्यरात्रीपासून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या डहाणू पलीकडे थांबवण्यात आल्या. तसेच पहाटेपासून सुरू होणाऱ्या उपनगरीय गाड्या बंद असल्याने भाऊबीजेसाठी निघालेल्या नागरिकांना वेगवेगळा उपनगरीय स्थानकांवर खोळंबून बसावे लागले आहे. रेल्वेची सेवा पूर्ववत होण्यास सकाळचे किमान ९ ते १० वाजतील असा प्राथमिक अंदाज आहे. याबद्दल पश्चिम रेल्वेचे कडून कोणत्याही प्रकारची घोषणा होत नसून गाडया अनिश्चित काळापर्यंत विलंबाने धावतील अशी सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours