मुंबई, 28 डिसेंबर : गेल्या 3-4 दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढला असून मुंबईदेखील गारेगार झाली आहे. आणखी काही दिवस मुंबईकरांना ही थंडी अनुभवता येणारा आहे. मुंबई आजचं तापमान 15.8 अंश आहे. तर तिकडे उत्तर महाराष्टातही थंडीची लाट आली आहे.
आज निफाडचं किमान तापमान 4 अंश तर नाशिकचं तापमान सात डिग्री नोंदवण्यात आलं. निफाडचे तापमान काल 1.8 सेल्सियस होतं. त्यात सुधारणा होऊन आज तापमान 4 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं. इथं थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसत असून उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांचे मोठे होत आहेत.
पुढचे 5 दिवस भारतासह महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नीचांकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला निफाडनं थंडीच्या बाबतीच मागे टाकलं. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पारा घसरला आहे. धुळ्यात तापमान 3.2 अंश सेल्सिअस, मनमाड 8 अंश सेल्सिअस, अकोला 8.5 अंश सेल्सिअस तर परभणीत आज 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours