मुंबई: लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त पाच महिने राहिले आहेत. तर आचारसंहिता दोन महिन्यात लागू होईल. त्यामुळं युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या असा अल्टिमेटम भाजपने शिवसेनेला दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीसाठी भाजपने शिवसेनेला वारंवार आवाहन केलं मात्र सेनेकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे जास्त वाट पाहायची नाही असं भाजपने ठरवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

युतीबाबत शिवसेनेशी बोलणी करण्यास भाजप सकारात्मक आहे. विधानसभेत काही जास्त जागा देण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. जानेवारी महिन्यापर्यंतच वाट बघू नंतर स्वबळाची तयारी करू असं भाजपन ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि सेनेत कटुता निर्माण झाली होती.

सत्तेत सहभागी होऊनही सेनेचं वागणं हे कायम विरोधी पक्षासारखच आहे. भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच त्यांनी स्वबळावर निवडणुक लढण्याची घोषणा केली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours