मुंबई:  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसंच 'युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल', असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की वेगवेगळ्या होणार यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.  मात्र चंद्रकांत पाटलांनीच निवडणुका वेगळा होणार असल्याचं जाहीर करत संभ्रम दूर केला आहे.
या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या होणार आहे, एकत्र होणार नाहीत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही  दिवशी अचानक युतीची घोषणा होईल.'
'काही पक्षांची 5 वर्षांनंतर बैठका होतात. शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात. युती इतकी भक्कम आहे की, सौम्य काय तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार आहे. काही तडे गेले असतील तरी ते भरुन निघतील.' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours