मुंबई : 'आम्ही तर कुठेच चर्चेत नाही. त्यामुळे चर्चा कुठे चालू आहे, हे आम्हाला माहित नाही. जर कुठे बोलणी गुप्तपणे चालू असतील तर चालू राहु द्या', असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच 'शिवसनेचा स्वबळाचा नारा आहे. त्यासाठी पक्ष काम करत आहे', असंही ते सांगायला विसरले नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधला युतीबद्दल दिवसेंदिवस सस्पेन्स वाढत चालला आहे. एकीकडे भाजपकडून युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे सेनेचे नेते संजय राऊत यांनी युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली.
'माणसानं राजकारणात सकारात्मक राहावं. भाजप आमचे मित्र जर सकारात्मक विचार करत असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्तम आहे.' असं राऊत म्हणाले.
'बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला सगळ्या क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा दिलेली आहे. मी युतीचा उल्लेख केलाय का तुमच्याकडे? शिवसेना राजकारणात आणि समाजकारणात कायम सकारात्मक काम करत असते. मागून मान मिळत नाही. कर्तृत्त्व असल्यानेच मान मिळतो. राजकारणात आम्ही कायमच मोठे भाऊ म्हणून राहिलो आहे', असंही ते म्हणाले.
Post A Comment:
0 comments so far,add yours