पुणे: एल्गार परिषद आयोजन प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. 1837 पानांचं हे आरोपपत्र आहे. या आरोपपत्रामध्ये सुधा भारद्वाज, पी. वरवरा राव, अरुण फरेरा,वर्णन गोन्सालव्हिस यांची नावं आहेत. शिवाय, CPI(M)चा माजी जनरल सेक्रेटरी गणपती यांचं देखील नाव आहे. गणपती सध्या फरार असून सुधा भारद्वाज, पी. वरवरा राव, अरूण फरेरा,वर्नन गोन्सालव्हिस तुरूंगात आहेत. पुणे येथे एल्गार परिषदेच्या आयोजनानंनतर भीमा - कोरेगाव येथे हिसांचार झाला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनामागे माओवाद्यांचा हात होता असा आरोप आहे.
2018 साली पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चौघांना अटक केली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना नजरकैदेत देखील ठेवण्यात आलं आहे.
काय आहे कोरेगाव भीमा प्रकरण?
भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजणाने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समाजाची वीण उसवली गेली.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी कोरेगाव भीमा याठिकाणी मोठा हिंसाचार उसळला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours