मुंबई 22 फेब्रुवारी : आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणबाबत केंद्राला शिफारस करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. आज उद्धव ठाकरे हे धनगर समाजाचं शिष्टमंडळ घेऊन वर्षा वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा केंद्राला आरक्षणाबाबत लवकरात लवकर शिफारस करू असं आश्वासन देत शिष्टमंडळची बोळवण केली.

शिष्टमंडळमधल्या धनगर समाजाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आश्वासन मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  दरम्यान या धनगर समाजाच्या शिष्टमंडळ भेटीच निमित्त साधत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत, नुकत्याच मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादाबाबत काय गुफ्तगू झाल असाव अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आधी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर ठाकरे यांनी शिष्टमंडळासोबत वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours