जुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका वाहनाने चिरडले. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. नगर-कल्याण मार्गावरील उदापूर येथे हा अपघात झाला. 
सकाळी पावने सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाता एकाच घरातील दोन महिलांचा तर त्याच्या घरी राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चालक फरार झाला आहे. संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत मार्गावरील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. संबंधित महिलाचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मीराबाई ढमाले, कमलाबाई ढमाले, सगुणाबाई गायकर अशी मृत महिलांची नावे आहेत. 
या अपघाताप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours