नागपुरातल्या वर्धा रोडवरील हल्दीराम आऊटलेट मध्ये वडा-सांबार खाल्ल्याने दोन जणांची प्रकृती बिघडली आहे. वडा-सांबरमध्ये पालीचं पिल्लू आढळल्याची तक्रार आता या ग्राहकांकडून करण्यात आली आहे. यश अग्निहोत्री आणि नेहा अग्निहोत्री अशी आजारी पडलेल्या ग्राहकांचा नावे आहेत. प्रकृती बिघडलेल्या दोन्ही ग्राहकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ग्राहकांकडून नाश्त्यात पालीचं पिल्लू आढळल्याची तक्रार करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours