मुंबई : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कारण सायनच्या लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात एका महिलेवर बलात्कार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मदत करण्याच्या बहाण्यानं अज्ञात व्यक्तीनं बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. पीडित महिलेच्या नातेवाईकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या देखभालीसाठी पीडित महिलादेखील सोबत म्हणून रुग्णालयातच राहतच होती. यादरम्यान, मदत करतो अशी बतावणी करत आरोपी बाह्यरुग्ण विभाग असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या घटनेमुळे पालिका रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचंही उघड झालं आहे.
दरम्यान, देशभरातच महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. चीड आणणाऱ्या या घडामोडींदरम्यान आता एका पोलीस शिपायाच्या पत्नीला पोलीस वसाहतीतून जबरदस्तीनं उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीनं पीडितेला दिली होती. 7 मे रोजी राजस्थानमधील डुंगरपूर येथे ही घटना घडली आहे.अलवर येथील कठमूरमध्ये सामूहिक बलात्काराच्याच दिवशी ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours