नवी दिल्ली, 12 मे: देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या राजधानी दिल्लीतील 7 जागांवर मतदान होत आहे. दिल्लीचा गड कोण मिळवणार यासाठी भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात लढत आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात मतदानाच्या आदल्या दिवशी ट्विटवर जुंपली.
शील दीक्षित यांनी थेट ट्विटवर केजरीवाल यांना आपल्या आरोग्य आणि प्रकृती संदर्भात अफवा का पसरवताय असा सवाल विचारला. माझ्या प्रकृतीसंदर्भात अफवार का पसरवताय. जर काही काम नसेल तर घरी जेवायला या. त्या निमित्ताने माझी प्रकृती कशी आहे ते देखील पाहता येईल. अफवा न पसरवता निवडणूक लढण्यास शिका असा टोला देखील दीक्षित यांनी यावेळी लगावला.
अरे भाई @ArvindKejriwal, मेरी सेहत को ले कर क्यूँ ग़लत अफ़वाहें फैला रहे हो? अगर कोई काम नहीं हो तो आ जाओ भोजन पर। मेरी सेहत भी देख लेना, भोजन भी कर लेना और अफ़वाहें फैलाए बिना चुनाव लड़ना भी सीख लेना
10.8K people are talking about this

त्यानंतर दीक्षित यांच्या ट्विवटरला केजरीवाल यांनी लगेच उत्तर दिले. मी तुमच्या प्रकृती संदर्भात कधी बोललो? कधीच नाही असे सांगत. माझ्या कुटुंबियांनी मला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यास शिकवले आहे. ईश्वर तुम्हाला चांगली आणि दिर्घ आयुष्य देवो. जेव्हा तुम्ही उपचारासाठी परदेशात गेला होता तेव्हा मी न सांगता तुमच्या घरी आलो होते. आता जेवणासाठी कधी येऊ? असा प्रश्न विचारत केजरीवाल यांनी त्यांना उत्तर दिले.

मैंने आपकी सेहत पर कब कुछ बोला? कभी नहीं। मेरे परिवार ने मुझे बुज़ुर्गों की इज़्ज़त करना सिखाया है। भगवान आपको अच्छी सेहत और लम्बी उम्र दे। जब आप अपने इलाज के लिए विदेश जा रहीं थीं तो मैं बिना बुलाए आपकी सेहत पूछने आपके घर आया था। बताइए आपके घर भोजन करने कब आऊँ?
5,260 people are talking about this
लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी न झाल्याने तिहेरी लढत झाली आहे. शीला दीक्षित यांनी नेहमीच केजरीवाल यांच्या सोबत आघाडी करण्यास विरोध केला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours