कोल्हापूर, 5 जून : कोल्हापुरातील सोमवार पेठेत किरकोळ वादावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून येथे मोठा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत वाहनांचीही तोडफोड केली. या घटनेत पोलिसांसह 10 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (4 जून)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे सध्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी एकूण 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तणावाची परिस्थिती पाहता परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours