मुंबई : ऐकेकाळी मुंबईत मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय होती. मात्र, गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला असल्याचं चित्र आहे. मुंबईत वाढत्या घरांच्या किंमती सामान्य मुंबईकरांच्या आवाक्या बाहेर गेल्यात आणि त्यामुळेच मराठी माणसाला मुंबई बाहेर जाण्याची वेळ आली आहे. उपनगरातील आवाक्याबाहेर गेलेले जागांचे भाव, वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण यामुळे मुंबईकरांनी शहराबाहेर कूच करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातून मराठी माणसावर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या प्रवासी संख्येतून हे धक्कादयक वास्तव समोर आलं आहे. भायखळा, दादर, चिचंपोकळी, चुनाभट्टी, माटुंगा, सॅण्डहर्स्ट रोड आणि शिवडी या मराठी बहुल भागातील लोकल प्रवासी संख्येत सरासरी 1 टक्क्याने घट झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours