मुंबई, 15 जून- मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
यासंदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक घेतली. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, मराठा समाज शिष्टमंडळातील प्रतिनिधी सर्वश्री राजेंद्र निकम, दिलीप पाटील, बाबा गुंजाळ, रुपेश मांजरेकर, संजय पाटील, विवेक सावंत, श्रीमती स्नेहा गावकर आदी उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यावंर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी होत होती. पोलीसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. त्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर तसेच डॉ. रणजित पाटील या उपसमितीचे सदस्य आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours