डोंबिवली, 5 जून : ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं सुरू आहे. कार्यालय गाठण्याची घाई असलेल्या प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. मध्य रेल्वेच्या स्टेशनवर यामुळे गर्दी झाली आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. दरम्यान, दरदिवशीच मध्य रेल्वेवर कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे खोळंबा होत असल्यानं प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours