मुंबई  :विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक सोमवारी (24 जून) बिनविरोध होण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार युतीचं संख्याबळ वरचढ होत असल्याने आघाडीकडून उमेदवार उभा करण्याची शक्यता शक्यता कमी आहे. सोमवारीच परिषदेचे उपसभापती आणि विरोधपक्षनेतेपदाची निवड होणार आहे. दुपारी ही निवड होईल आणि नावं जाहीर होणार आहेत.
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीच्या बदल्यात परिषदेच्या उपसभापतीपदाची निवड बिनविरोध करण्याची अट सत्ताधारी पक्षाकडून घालण्यात आली होती. अशा प्रकारचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांनाही दिले होते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होऊन परिषदेत उपसभापतीपदासाठी उमेदवार उभा करायचा नाही असं ठरलं आणि विरोधी पक्षनेतेपदाचाही मार्ग मोकळा झाला.
विदर्भातले नेते विजय वड्डेट्टीवार यांचं नाव काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केलं आहे. वड्डेट्टीवार हे आक्रमक असून विदर्भातलेच असल्याने देवेंद्र फडणवीसांना आक्रमकपणे अंगावर घेतील अशी काँग्रेसची व्ह्युरचना आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेल्याने विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करायची असा प्रश्न काँग्रेससमोर होता. त्यानंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून वडेट्टीवारांचं नाव निश्चित करण्यात आलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours