नवी दिल्ली, 24 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये भारताने आतापर्यंत पाचपैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. भारताचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना भारताची दमछाक झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटाकांत 224 धावा केल्या. त्यानंतर बुमराह आणि शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने 11 धावांनी मिळवला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्ट्रिकनंतर शमीच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत हसीन जहा म्हणाली की, देशासाठी खेळणं ही प्रत्येक खेळाडूसाठी गर्वाची गोष्ट आहे. त्यातही सामना जिंकून देणं त्यापेक्षा मोठी आणि चांगली गोष्ट आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकावा अशी इच्छा असल्याचंही हसीन जहाने म्हटलं. तिने मोहम्मद शमीबद्दल थेट काही वक्तव्य केलं नाही. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर अशीच कामगिरी पुढच्या सामन्यात करावी लागेल.
मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या कामिगिरीने सर्वांची मनं जिंकली. मात्र, एकवेळ अशी होती ज्यावेळी त्याची कारकिर्द पणाला लागली होती. पत्नीने मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला होता. तसेच शमीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचंही हसीन जहाने म्हटलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours