तालुका प्रतिनीधी : सलीम मिर्जा 
लाखनी: लाखनी पाेलिस स्टेशन येथे कार्यरत पाेलिस उपनिरीक्षक स्वप्निल निराळे व त्यांचे मदतनिस पाेलिस नायक घनराज भालेराव यांना मिळालेल्या गुप्त बातमिच्या आधारे लाखनी पाेलिस स्टॉफ च्या मदतिने पाेलिस स्टेशन लाखनी समाेर नाकाबंदी करुन सापळा रचुन परराज्यातिल दाेन विना नंबरच्या माेटारसायकल डिस्कवर व सिटी १०० हे छत्तिसगढ वरुन नागपुर कडे जात असलेल्या ४ इसमांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्यांची व त्यांच्या मालाची झडति घेतली असता अंदाजे ४० किलाे गांजा किंमत ४ लाख रुपये व माेटारसायकल चि किंमत १ लाख रु.असा एकुण ५ लाख रु.माल जप्त करण्यात आला.या प्रकरणी आराेपि पवन उपाध्याय,बालाराम टुंबरे,साेनु दुबे,व किशाेर उईके सर्व राहणार सानेगाव ,जि.देवास मध्यप्रदेश येथिल असल्याचे सांगितले.
--- सदर आराेपिंवर लाखनी पाेलिस स्टेशन येथे अ.प्र.क्र.१६४/१९ कलम २० (ब) २९NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नाेंद करण्यात आला असुन पुढिल तपास पाेलिस ऩिरीक्षक दामदेव मंडलवार करित आहेत। सदर कार्यवाई साठी पाेलिस उपनिरिक्षक स्वप्निल निराळे, स.फाै.देवानंद संतापे,पाे.ह.भगवान थेर,विजय हेमने,अकरम पठाण, पाे.नायक धनराज भालेराव ,प्रकाश तांडेकर,उमेश शिवनकर व सर्व पाेलिस स्टॉफ यांनी ही यशस्वि कार्यवाई केली
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours