भंडारा, 6 जुलै: तुमसर तालुक्यात नकुलसुकळी गावातील दिव्यांग व्यक्तीवर रानडुकरानं हल्ला चढवला. रानडुकराच्या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. हा युवक आपल्या तीनचाकी सायकलने सुकळी नकुल ते गोंडीटोला रोडवर जात असतांना अचानक जंगली डुकराने त्याच्यावर हल्ला चढवला असतांना त्याने रानडुक्करीला हाकलुन लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. रानडुक्कराने त्याला रक्तबंबाळ केलं. शेवटी तिथल्या काही तरुणांनी मिळून डुकराला पळवलं आणि युवकाचे प्राण वाचले
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours