मुंबई, 10 ऑगस्ट- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यात मोठी कारवाई केली आहे. अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा भंडाफोड करून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी 7 जणांनी अटक केली आहे. आरोपींकडून 500 बनावट सिम, अनेक टेलीफोन रिसूव्हर, 3 लॅपटॉप, 4 डेस्कटॉप, 11 मोबाइल फोन, एक सर्व्हर आणि 4 वायफाय राऊटर जप्त केले आहे.
देशात घातपातासाठी वापर..?
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकूण 5 ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजमधून बहुतांश कॉल मिडल ईस्ट देशांमध्ये करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा वापर देशात घातपातासाठी वापर होत असल्याचा संशय एटीएसने वर्तवला आहे. व्हीवोआयपी इंटरनेट कॉलद्वारे लोकल नंबरला यूएई आणि आखाती देशांमध्ये रूट करण्याचे काम चालत होते. व्हीओआयपी कॉलद्वारा सरकारला सुमारे 37 कोटी रुपयांना चूना लावल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे.
कसाबला जिवंत पकडणारा पोलीस अधिकारी निलंबित!
दरम्यान, 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय गोविलकर आणि सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे यांना मुंबई पोलिस आयुक्तांनी निलंबित केलं आहे.
संजय गोविलकर यांनी दाऊदचा हस्तक सोहेल भामला याला मुंबई विमानतळावरून सोडल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. दुबईतून मुंबईत आल्यावर सोहेलला विमानतळावर ताब्यात घेतलं होतं. अशी माहिती मिळते. गोविलकर यांच्यासोबत शिंगोटे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर होता. दोन्ही अधिकारी मुंबई पोलिसात आर्थिक गुन्हे शाखेत ते कार्यरत होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours