पुणे, 31 ऑगस्ट : मायलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलगी नकोशी झाली म्हणून जन्मदात्यांनी तिला जंगलात बेवारस सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात नुकत्याच जन्मलेल्या या चिमुकलीला फेकण्यात आलं होतं. शुक्रवारी (30 ऑगस्ट) ही घटना उघडकीस आली. राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अर्भक ताब्यात घेतले. पण दुर्दैवानं चिमुकलीचा आधीच मृत्यू झाला होता. "मुलगी वाचवा, देश वाचेल" असा नारा देशभरात दिला जातो. मात्र प्रत्यक्षात या संदेशाचं किती पालन केलं जात? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जन्मलेली मुलगी नकोशी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या तीन महिन्यांत खेड तालुक्यात एकूण चार नकोशी आढळून आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगरजवळील पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात ही चिमुकली बेवारस आढळली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता त्यांना नुकतीच जन्मलेली ही चिमुकली आढळून आली. मात्र ती मृतावस्थेत होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिसात अज्ञात आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours