मुंबई, 01 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपचं जागावाटप निश्चित झाल्याने शिवसेनेने निश्चित केलेल्या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप केलं. मातोश्रीवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या उमेदवारांना AB फॉर्म दिलेत. तर काही फॉर्म्स हे स्थानिक नेत्यांकडे दिलेत. असं असतानाही काही महत्त्वाच्या उमेदवारांवर शिवसेनेकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते.
गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं गाडं अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून मार्गी लागलं. जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. कारण युतीची घोषणा फक्त पत्रक काढून करण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवातही केली होती, पण घोषणा व्हायची बाकी होती. ती सोमवारी संध्याकाळी निव्वळ पत्रक काढून करण्यात आली. संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळलं. त्यामुळे कोणाला कुठली जागा मिळणार, जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे स्पष्ट झालेलं नाही.
अशात निश्चित झालेल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. तर काही उमेदवारांवर अद्याप शिवसेनेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे युतीच्या फॉर्म्युल्यात या जागा भाजपच्या गोटात गेल्या की काय अशी चर्चा आहे. त्यात असे एबी फॉर्म्स दिल्याने बंडखोरीची शक्यता असल्याने AB फॉर्म देणं थांबविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. युतीच्या घोषणेला वेळ होत असल्याने वेळेवर घाई होऊ नये म्हणून AB फॉर्म्सचं वाटप सुरू करण्यात आलं होतं.
काही निवडणुकींमध्ये उमेदवाराला वेळेत AB फॉर्म न मिळाल्याने त्याला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता अशा घटना घडल्या होत्या. आता 2 आणि 3 ऑक्टोंबरला AB फॉर्म उमेदवारांना दिले जातील. जेणे करून बंडखोरांना बंडखोरी करण्यासाठी वेळ मिळू नये यासाठी शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours