कोल्हापूर: निवडणुकीच्या प्रचारसभेच बोलणारे कायम जोशात असतात. अतिशय आक्रमपणे बोलून लोकांना आपलं मत पटवून द्यावं या उद्देशाने जोषात आणि आवेशात बोललं जातं. मात्र हा आवेश कधी कधी अंगलटही येतो. त्यामुळे चुका घडतात आणि मग नेत्यांना ती सुधारावी लागते. सोशल मीडियामुळे तर आता काहीच लपून राहात नाही. छोटीशी चूकही लगेच व्हायरल होते. गोकुळगाव शिरगाव इथंही असंच झालं. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडीक हे बोलताना चुकून 'कमळा' ऐवजी 'घड्याळा'चं बटन दाबा असं म्हणाले आणि सगळ्यांनाच त्यांची चूक लक्षात आली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी चूक सुधारली आणि भाषण पुढे नेलं.
धनंजय महाडीक हे अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तोच धागा पकडत महाडीक म्हणाले, मी अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते त्यामुळे 'कमळा' ऐवजी 'घड्याळ' म्हणालो. पण लक्षात असू द्या आता घड्याळ नाही तर कमळ हे लक्षात ठेवा. कमळावरच बटन दाबून भाजपला विजयी करा. अमल महाडीक यांच्या प्रचारासाठीच्या सभेत ते बोलत होते. विरोधक जात, पात, धर्म याचा प्रचारासाठी वापर करत आहेत. अशा कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours