मुंबई, 17 मे: कोरोनाव्हायरसच्या संकटात भारतीय रेल्वे सामान्यांच्या मदतीला धावून आली आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून अनेक रुग्णांसाठी वेळेवर जीवन रक्षक औषधींसोबतच पीपीई उपकरणही उपलब्ध करुन देण्यात आले. यापैकी एक आहेत सोलापूरचे रहिवाशी सुशील पाडी. त्यांच्या केवळ एका ट्वीटनंतर रेल्वेने ब्लड कॅन्सरशी झुंज देणारे सुशील पाडी यांच्या वडिलांसाठी मुंबईहून सोलापूरला औषधी पाठवल्या. रेल्वेच्या या कार्याची सोशल मीडियात मोठी प्रशंसा होत आहे.

मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रवक्ता ए.के जैन यांनी सांगितलं की, 12 मे रोजी सुशील पाडी यांनी केलेल्या विनंतीनंतर अवघ्या 24 तासांत मुंबईहून सोलापूरला त्यांच्या वडिलांसाठी कॅन्सरची औषधी पोहोचवण्यात आली. औषधी मिळाल्यानंतर सुशील पाडी यांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले. "श्री जितेंद्र मिश्रा और उत्तम दास (CSMT पार्सल कार्यालय) को उनके असाधारण योगदान व सहयोग के लिए धन्यवाद।", असं सुनील पाडी यांनी ट्वीट केलं आहे.
मुंबईहून सोलापुरला अशी पोहोचली औषधी...
सुशील पाढी यांचे वडील ब्लड कॅन्सरने पीडित आहेत. ते एक नौदल कर्मचारी होते. सध्या ते सोलापुरात आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना मुंबईत परत येता आले नाही. औषधीअभावी वडिलांची प्रकृती खालावली. सुशील यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या ट्विटर हँडलवर ट्वीट करून मदत मागितली. रेल्वेनेही या सुनील पाडी यांनी केलेल्या ट्वीटची तत्काळ दखल घेतली. याबाबत मुंबईच्या डीआरएम यांना माहिती देण्यात आली.
मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी यावर कारवाही केली. वाणिज्य निरीक्षक (पार्सल) जितेंद्र मिश्रा यांनी पार्सल क्लर्क उत्तम दास यांच्या सहकार्याने औषधी विशेष पार्सल रेल्वे गाडीने सोलापुरला पाठवण्यात आली. एवढंच नाही तर औषधी सुनील पाडी यांना घरपोच देण्यात आली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours