रीपोटर... संदीप क्षिरसागर 

गोंदिया, दि.२३ – काही दिवसांपूर्वी ग्रीन असलेला गोंदिया जिल्हा २१ मे रोजी तब्बल २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे रेड झोनमध्ये आला. एवढेच नव्हे तर २२ मे रोजी ५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात एकूण ३५ कोरोना बाधित रुग्ण झाले. तर आज शनिवारला ४ रुग्ण आढळल्याचे वृत्त आले, असून गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव,गोंदिया तालुक्यातील कटंगी (नागरा) व तिरोडा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. तिरोडा शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असून परसवाडा गावातील एक रुग्ण आहे. आज आढळलेल्या रुग्णामध्ये बहुतांश मुंबई येथून आलेले रुग्ण असून दोन मुंबईत परिचारिका राहिलेल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. मास्कचा वापर करणे ,फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात पाण्याने स्वच्छ धुणे यासह अन्य उपाय योजनांवर भर देण्यात आला आहे.

बाहेर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काहींना शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशा रुग्णांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. अशा रुग्णांची कोरोना विषाणू संसर्ग करण्यासाठी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी सध्या नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. केवळ तीन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येमध्ये झालेली दोन अंकी वाढ ही जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. ही रुग्ण संख्या वाढू नये यासाठी घराबाहेर कोणीही पडू नये. अत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या कामानिमित्तच घराबाहेर पडावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. ४१९ जणांचे चाचणी अहवाल आतापर्यंत नकारात्मक आले असून २२ मे पर्यंत ८५ चाचणी अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण २६ मार्चला आढळला. त्याच्यावर उपचार करण्यात आले.१० एप्रिल रोजी त्याचा चाचणी अहवाल नकारात्मक आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्याला २२ मे रोजी ५० दिवस पूर्ण झाले.  १९ मे रोजी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एका दिवसानंतर म्हणजे २१ मे रोजी तब्बल २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आता सजग राहून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आणखी ५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या ३५ इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे २०५, आमगाव येथे ५, अर्जुनी /मोरगाव येथे ११ आणि सडक/अर्जुनी येथे ६ असे २२७ रुग्ण, तर डेडिकेटेड केअर हेल्थ सेंटर असलेल्या एम एस आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया येथे १ आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ३ अशी एकूण २३१ रुग्ण रात्री नऊपर्यंत भरती करण्यात आले आहे. तर शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे ४, लईटोला येथे ५, तिरोडा येथे १२, उपकेंद्र बिरसी येथे ७,शासकीय आदिवासी आश्रमशाळा, ईळदा येथे १२, शासकीय निवासी शाळा,डव्वा येथे ८, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४, मरारटोली गोंदिया येथे ९ आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह, गोंदिया येथे ७ असे एकूण ६८ व्यक्ती शासकीय संस्थात्मक केंद्रात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी दिली
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours