नागपूर:: अनधिकृत भूखंडाची पुनविक्री नोदंणी सुरू करा या मागनी करीता दाखल याचिकेवर नागपुर खंडपीठाने सहजिल्हा निबंधक, महानिबंधक शहर व ग्रामीण आणि राज्याचे महानिबंधक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तरसादर करण्याचे आदेश दिलेत
न्याय. सुनिल शुक्रे आणी न्या.अनिल किलोरे यांनी यासंबंधी आणखी एक याचिका या दखल याचिकेसोबत एकत्र केली आहे. अनिधिक्रूत अभिन्यासातील भूखंडांचे झालेल्या विक्रीचे पुर्नविक्री(रजिस्ट्री) नोदंणी करा,अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाने तुकडेबंदी कायधानुसार उल्लंघन होत असल्यामुळे राज्यशासनाने १२ जुलै २०२१ रोजी रजिस्ट्रीची पुनविक्री बंद केली. दुय्यम निबंधकाना पुनविक्री नोंदणी बंद करता येते नाही. तसेच हा शासन निर्णय लागू होत नसल्यामुळे पुनविक्री नोंदणी सुरू करा या मागणीकरीता पवन घिमोले यांनी अँड.दर्शन सिराज याच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जागेची विक्री झाल्यावर रजिस्ट्री बंद करता येत नाही शहरात हा कायधा लागू होऊ शकत नाही, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेतून प्रतिवादी क्रमांक
४ ते ३१ या प्रतिवादींना वगळले आहे
सरकारतर्फे अँड. केतकी जोशी यांनी बाजु माडली आहे
Post A Comment:
0 comments so far,add yours