कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 तारखेपासून मुंबईला दूधपुरावठा रोखण्यासाठीच आंदोलन घोषित केलंय. शेतकऱ्यांना लिटरमागे 5 रुपयांची दरवाढ देण्याची मागणी त्यांनी केलीये. मात्र आंदोलनाच्या दोन दिवस आधीच पुण्यातल्या प्राईड हॉटेलमध्ये खाजगी आणि सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडलीये. या बैठकीत शेतकऱ्यांना लिटर मागे तीन रुपये वाढवून देण्याचा निर्णय झालाय.
सरकार ने दूध भुकटी ला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे टप्प्या टप्प्याने दूध दरवाढ करता येईल अशी भूमिका या दूध संघांनी घेतलीय. जीएसटी मध्ये सूट दिल्यानंतर पुढची दरवाढीचा घोषणा करू असही या बैठकीत ठरलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours