पंढरपूर, 22 जुलै : उद्या आषाढी एकादशी आहे. टाळ-मृदुगांच्या गजरात अवघी पंढरी आता वारकऱ्यांनी सजू लागली आहे. पण यात मराठा मोर्चाचीही हवा आहे. सोलापूर पाठोपाठ पंढरपूर शहरातही मराठा मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. उद्याचा वारीतला दिवस निर्धोक पार पडण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी एक पत्र लिहिलं आहे. यात प्रत्येकानं सकारात्मक पद्धतीने योगदान देण्याची गरज असल्याचं त्यांनी उदयनराजेंनी या पत्रात लिहिलं आहे.
पंढरपूरमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एसटी बस फोडली आहे. पंढरपूर-सांगोला रस्त्यावर ही बसची तोडफोड करण्यात आली आहे. पण या सगळ्यातून पंढरपूरची वारी निर्विघ्न पार पडावी यासाठी उदयनराजे भोसले यांनी पत्र लिहलं आहे.
उद्याच्या आषीढी वारीसाठी देशभरातून करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यात कोणतीही हिंसा होऊ नये आणि त्यात कोणतीही हानी होऊ नये. त्याचबरोबर विठ्ठलाच्या या पवित्र सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी उदयनराजे यांनी हे पत्र लिहलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours