भंडारा दि. १८ :– भंडारा गोदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार नानाभाऊ पटोलें यांनी राष्ट्रीय काँग्रेस किसान खेत मजदुरंच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सुत्रे सोमवारी दिल्लीत स्विकारल्यानंतर आज मंगळवारला आपल्या मतदार संघातील भंडारा येथे मोदी सरकार व फडणवीस सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढून शासनाच्या सर्व सामान्य, शेतकरी, शेतमजूर युवा रोजगार विरोधी सरकारचा जनआक्रोशी मोर्चा काढण्यात आला. दसरा मैदानातून निघालेला हया मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येत धडक दिली. या मोरच्यांचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले यांनी केले. या मोर्च्यात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, शहर कमेटीचे अध्यक्ष सचिन घनमारे, प्रफुल्ल गुडधे, डॉ.विनोद भोयर, मुजीब पठाण, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे,डाॅ.पंकज कारेमोरे, मधुकर लिचडे, प्रकाश पचारे, प्रेम वनवे, रेखा वासनिक, बंडू ढेंगरे, खुशाल गिदमारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.  या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडरचे कटआऊट, डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या

राफेल लढाऊ विमान घोटाळा व भ्रष्टाचाराची वाचा फोडण्याकरिता, गॅस, पेट्रोल, डिझेल ची भस्मासुरी दरवाढ थांबविण्याकरिता इंधन भार कमी करण्यास शासनाला भाग पाडण्याकरिता, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करिता, शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ करण्याकरिता, शेतकऱ्यांना २४ तास विज मिळण्याकरिता,  २०१४ ते २०१८ पर्यंतचे सर्व पिक विम्याचे पैसे मिळविण्याकरिता, युवक बेरोजगारी-युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता, एस.सी., एस.टी, ओबीसी विद्याथ्र्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्याकरिता, महिलांवरील अत्याचाराला आळा बसविण्याकरिता तसेच अन्यायाला वाचा फोडण्याकरिता शेतकरी-शेतमजूर-त्रस्त सामान्य जनतेच्या या मागण्या घेऊन या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.लोकनेते व राष्टीय किसन नेते यांनी जन आक्रोश मोर्च्यांला संबोधित केले आणि शासनाच्या नाकर्तेपणावर प्रकाश टाकला.










Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours