सपादिका.सुनिता परदेशी........।रिपोर्ट.विजय क्षिरसागर....
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत याचा निषेध् म्हणुन श्री रामसेना सामजिक संघटना साकोली च्या वतीने पेट्रोल - डीज़ल दरवाढ व अवैध धंदे बंद करण्याबाबत उपविभागीय अधिकारी माननीय अर्चना मोरे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. इंधनाशिवाय दळणवळण अशक्य असून, वाहनधारकांसाठी पेट्रोल आणि डिझेल या जीवनावश्यक बाबी बनल्या आहेत. गेल्या सलग महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असून, त्यामुळे नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे . तसेच तालुक्याचे ठिकाण असलेले साकोली शहरात सध्या गांजा व स्मोकिंग पावडर बनावटी व बेकायदेशीर दारू विक्री ,सट्टा व्यवसाय ,जुगार सारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने तरुण वर्ग व विद्यार्थी या व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी प्रवृती वाढत असल्याचे चित्र आहे. करीता त्वरित कारवाई करावी अन्यथा श्री रामसेने तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल तसेच निवेदन देतेवेळी श्री रामेसेनेचे जिल्हाध्यक्ष अखिलेशजी गुप्ता , माहामंत्री सोनुभाऊ बैरागी , तालुका अध्यक्ष आकाश बोकडे , सचिव पंकज झोड़े , तालुका उपाध्यक्ष पंकजभाऊ सपाटे ,प्रचार प्रमुख़ कुणाल क्षीरसागर, विशाल मेश्राम ,विशाल वाघाडे,विश्वास सोनवाने,कुणाल राउत,योगेश मेश्राम,नितिन झोड़े,सोनू भिवनकर,सचिन सोनवाने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





Post A Comment:
0 comments so far,add yours