भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनः रिक्षन कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादी प्रसिद्ध केल्या नंतर ज्या पत्र मतदारांचे नाव समाविष्ट केले गेलेले नाहीत अथवा प्रारूप मतदार यादी मध्ये करण्यात आलेल्या नोंदणी बाबद आक्षेप घ्यावयाचा असेल किंवा त्यामध्ये दुरुस्ती सुधारणा करावयाच्या असल्यास अश्या मतदारांनी विहित नामुन्या मध्ये अर्ज करता येईल अशी माहिती शिल्पा सोनाले मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे पत्रकार /राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात नागरिक व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनः रिक्षन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे मतदार यादी प्रसिद्ध शनिवार 1 सप्टेंबर 2018 दावे व हरकती स्वीकारणाचा कालावधी 1सप्टेंबर ते 31 आक्टॉम्बर 2018 दावे व हरकती निकालात काढणे शुक्रवार दि 30 नोव्हेंबर 2018 पूर्वी दातांबेसचे अद्यावतीकरन आणि पुरवणी यादीची छपाइ गुरुवार दि 3 जानेवारी 2019 पूर्वी अंतिम मतदार यादी

प्रसिद्ध शुक्रवार दि 4 जानेवारी 2019 दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय 18 वर्ष्या पेक्ष्या कमी नाही म्हणजे ज्याची जन्म तारीख 1 जानेवारी 2001 च्या पूर्वी आहे व जो सामान्य रहिवाशी आहे अशी वैक्ती मतदार म्हणून नोंदणी साठी पात्र राहील दि 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्या नंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ठ केली गेलेली नाहीत  अथवा प्रारूप मतदार  यादी  मध्ये करण्यात आलेल्या नोंदणी बाबद आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती सुधारणा  करावयाची असल्यास अश्या मतदारांनी विहित नामुन्या मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे हे अर्ज दि 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधी मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच मतदान नोंदणी कार्यालय असेच  सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालय स्वीकारण्यात येतील लोकप्रतिनिधींत्व अधिनियम 1950 कार्यपद्धतीची अनुपालन करून पूर्वीच्या मतदार यादी मध्ये झालेल्या अन्यत्र स्थलांतरित  झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावेवगळण्यात आली आहेत अश्या वगळण्यात आलेल्या नावाची यादी मतदार नोंदणी कार्यालय तसेच तहसील कार्यालय व मतदान केंद्र या ठिकाणी प्रसिद्ध

करण्यात आलेली आहे. या बाबद 63 विधानसभा मतदार संघाची राजकीय पक्ष व पत्रकार व नागरिक यांची सभा आयोजित करण्यात आली होती सादर सभेमध्ये राजकीय पक्षांना सूचना करण्यात आले आहेत की त्यांनी प्रत्येक मतदार केंद्रावर त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची नेमणूक करावी शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे या सभे साठी

धनंजय देशमुख तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी  अधिकारी नवंनाथ कातकडे नायब तहसीलदार सुनील भांडारकर नायब तहसीलदार निवडणूक व राजकीय पक्षांचे राजकीय पक्षां तर्फे सौ रचना गहाने , किशोर तरोने, सोमनाथ ब्राह्मणकर , रत्नदीप दहिवले , उमाकांत ढेंगे व विविध पक्ष्याचे पदाधिकारी तसेच तालुक्याचे पत्रकार उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours