लाखनी-----२ ऑक्टाेंबर २०१८ ला महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंत्ती दिन असुन या तारखेला शिवसेना लाखनी तालुका प्रमुख पदावर असलेले देवानंद उके हे बाेरगाव/राजे.येथे भारतमातेची मुर्ती विना परवानगीने मांडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी .अन्यथा मी २ ऑक्टाेंबर राेजी प्रशानाच्या आवारात आत्मदहन करणार या आशयाचे पत्र प्रशासनिक यंत्रनेला दीला असुन या आत्मदहणाला शिवसेना साेबत नसल्याचे जिल्हा प्रमुख लवकुश निर्वाण यांनी पत्रप्रसिध्द मार्फत माहिती देऊन कळविले आहे.
--------बाेरगाव/राजे. गावामधे ग्रामपंचायतच्या समाेरील जागेवर भारतमातेची मुर्ती राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या प्रेरणेने १९६८,साली मांडण्यात आली हाेती.ही मुर्ती मागील काही वर्षांपासुन जिर्ण अवस्थेतेत आली हाेती ती मुर्ती भारतमातेची असल्यामुळे तीचे रक्षण करुन सर्व गावकऱ्यांनी एक समिती नेमुन ह्या मुर्तीचा जिर्णाेद्वार करण्याचे ठरविले त्यात जुनी मुर्ती मध्यभागी असल्यामुळे व दुरुस्त करण्याचा स्थितीत नसल्यामुळे समिती,ग्रामपंचायत व गावकरी यांच्या संम्मतिने जवळ लागुन असलेल्या आेट्याच्या पश्चिम काेपऱ्यावरती नवीण मुर्तीची स्थापणा करन्याचे ठरविन्यात आले.सुरक्षेच्या दृष्टीने व गावहिताच्या दृष्टीने लाेकांना विश्वासात घेवुन ही स्थापना केल्यामुळे त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या मुर्तीला गावकऱ्यांचा काेणताच विराेध नाही ती मुर्ती याेग्य ठीकाणी आहे व त्याच ठिकाणी राहावीअसे सर्व गावकऱ्यांने सुद्धा सांगितले आहे.
--------नवीन मुर्ती त्याच जागेवर पाहीजे व भारतमातेची स्थापनेची परवानगी घेतली नाही म्हणुन स्थापणा करणाऱ्यांवर (संपुर्ण गावावर) कारवाई करण्याचे बालहट्ट धरुन व तशा आशयाचे पत्र प्रशासनिक यंत्रनेला दिल्यावरुन कि,येत्या २ ऑक्टाेंबर ला देवानंद उके प्रशासनाच्या आवारात आत्मदहन करनार या आशया चा पत्र यांनी प्रशासनाला दिलेले पत्र शिवसेना लेटर पँड वर असल्याने उप जिल्हा प्रमुख लवकुश निर्वान यांनी कळवीले आहे कि,शिवसेना तालुका आत्मदहण व भारतमातेच्या कार्यात विघ्न निर्माण करणाऱ्याच्या बाजुने शीवसेना पक्षाचा काही संबध नाही यांचा आत्मदहण वैयक्तिक आहे स्वत:पु्र्ता आहे असे पत्रप्रसिद्ध मार्फत माहिती देऊन कळविले आहे ।
Post A Comment:
0 comments so far,add yours